दिव्यांगसाठी सोयी सुविधा

दिव्यांग वैद्यकीय प्रमाणप्रत्र 


दिव्यांगांसाठीच्या असणाऱ्या शासकीय सेवा सुविधाचे लाभ मिळवण्यासाठी दिव्यांगांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.  किमान  40% दिव्यांगात्व असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक / जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे. दिव्यांग प्रमाणपत्र असल्याशिवाय दिव्यांगांना असणाऱ्या शासकीय सेवा सुविधा मिळू सकत नाही. अथवा दिव्यांग व्यक्ती त्यास प्रात्र ठरत नाही.
  हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
प्रमाणपत्रसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
1)आधार कार्ड
2)राशन कार्ड
3)शाळेची बोनाफाइट
4) पास फोटो
5) जुने कागदपत्रे (असल्यास)
संपर्क :-
संबधित जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय .


 शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना 


अटी व शर्ती:
अर्जदार वर्ग १ ली ते १० वी वर्गात नियमित शिक्षण घेत असावा.
अर्जासोबत वार्षिक परीक्षेची गुणपत्रिका.
 दिव्यांग प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडण्यात यावी.
शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा राहणार नाही.

शिष्यवृत्ती लाभ :-
वर्ग १ते ४ दरमहा १०० वार्षिक १०००
वर्ग ५ते ७ दरमहा १५० वार्षिक १५००
वर्ग ८ते १० दरमहा २०० वार्षिक २०००

संपर्क:
संबंधित शाळेचे मुख्याध्यापक.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी.


संजय गांधी निराधार योजना


 संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे.

पात्रतेचे निकष, अटी आणि शर्ती
निराधार, वृद्ध व्यक्ती,  अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्या.
किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.
वय- ६५ वर्षांपेक्षा कमी.
कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये ५०,०००/- पर्यंत.
लाभाचे स्वरूप
लाभार्त्यांस दरमहा रुपये ८००/- देण्यात येतात.
एका कुटुंबात एका पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला रुपये १२०० प्रतिमाह अनुदान देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे.
वयाचा दाखला
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा दाखला (५०,०००/- हजार पेक्षा कमीचा )
आधार कार्ड
राशन कार्ड
बँक पासबुक
तलाटी प्रतिवेदन
संपर्क :-
शासन मान्य सेतू केंद्रातून online फॉर्म भरणे (आपले सरकार)
संबंधित तहसिलदार.


दिव्यांग व्यक्तींना एस.टी. प्रवासात सवलत 


दिव्यांग  व्यक्तींना दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे एस. टी. प्रवास भाड्यात 75%  व त्याच्या सोबत्यास 50%  प्रवास सवलत देण्यात आली आहे.
अटी व शर्ती:-
दिव्यांगाचे  प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकाकडून प्राप्त केलेले असावे.
 दिव्यांगाचे प्रमाण40 % हून अधिक असावे.
लाभार्थी महाराष्टाचा जिल्हयातील रहिवासी असावा.
राशन कार्ड
रह्वासी दाखला किव्वा टी.सी.
संपर्क:-
शासन मान्य सेतू केंद्रातून online फॉर्म भरणे (आपले सरकार)
व १० दिवसानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे कडे फॉर्म ची प्रिंट व दोन फोटो घेऊन जाने नंतर  संबधित बस स्थानक येथे जाऊन कार्डवर शिक्का घेणे. 



रेल्वे प्रवासात अपंग व्यक्तींना सवलत


अपंग व्यक्तींना रेल्वे प्रवासात सवलत मिळण्यासाठी


 दिव्यांगाचे  प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकाकडून प्राप्त केलेले असावे.
 दिव्यांगाचे प्रमाण40 % हून अधिक असावे.
लाभार्थी महाराष्टाचा जिल्हयातील रहिवासी असावा.
राशन कार्ड
रह्वासी दाखला किव्वा टी.सी.

संपर्क:-
जिल्हा सामान्य रुग्णालय व रेल्वे स्टेशन


UNIQUE DISABILITIES IDENTITY CARD


दिव्यांगांना कोणतेही लाभ सहजपणे मिळण्यासाठी भारत सरकार द्वारे संपूर्ण दिव्यांगांचे एकच ओळखप्रत्र तयार करण्यात येत आहे.
आवश्यक कागदपत्र
फोटो
दिव्यांग प्रमानपत्र
 पुढील पैकी कोणतेही एक
    अ}) आधार कार्ड
    ब}  ड्रायविंग लायसन्स
    क} डोमिसियल
    ड} पासपोर्ट ,
    इ}  राशन कार्ड ,
    ई} वोटर कार्ड ( इलेक्शन कार्ड )
संपूर्ण फॉर्म भरूण झाल्यानंतर सामान्य रुग्णालय येथे एक प्रत घेऊन जाने वेरीफिकेशन करणे ( सोबत आधार कार्ड घेऊन जाने.) हे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्मार्ट कार्ड तयार होऊन पोस्ट द्वारे घरपोच मिळेल.
संपर्क  :-
शासन मान्य सेतू केंद्रातून online फॉर्म भरणे(swavlambancard.gov.in)
 शासकीय सामान्य रुग्णालय.






   








No comments:

Post a Comment