बौद्धिक अक्षमता


बौद्धिक अक्षमता

           सर्व सामान्य व्यक्तीपेक्षा बुद्धीची वाढ़ कमी झाल्याने निर्माण होना-या मानसिक बौद्धिक अपंगत्वाला   मतिमंदत्व असे म्हणतात त्यामुले त्या व्यक्तीला सभोवतालच्या वातवरणात समाजात समायोजन करता येत नाही सामाजिकरित्या ती स्वतंत्र राहू शकत नाही याची मुख्य लक्षणे म्हणजे अशा मुलांची वाढ व विकासाचे टप्पे उशिरा असतात भाषेची वाढ झालेली नसते मलमुत्रविसर्जनावर ताबा ठेवता येत नाही दुस-या मुलामध्ये समरूप होऊ शकत नाही इतरांच्या बरोबरीन अभ्यास करू शकत नाहीत किंवा अभ्यासात वाढ होऊ शकत नाही


मतिमंदत्वाचे निदान कसे करावे :-
     दोन गोष्टीवरुन मतिमंदत्वाचे निदान करता येते
मतिमंदत्व कसे ओळखावे :-
मतिमंदत्वामूऴे  निर्माण होणा-या समस्या :-



१)चिकित्सलयींन तपासणी / क्लिनिकल असेसमेंट

२)बुद्धि मापनाच्या बौद्धिक चाचण्यावरुण

मतिमंदत्व होण्याची कारणे :-
      मतिमंदत्व होण्यास अनेक गोष्टि कारणीभुत आहेत जन्मापुर्वी , जन्मतेवेळी व जन्मानंतरच्या कारणीभुत गोष्टीना आपण आऴा  घालुन मतिमंदाचा प्रतिबंध करू शकतो.
 १)जेनेटिक फैक्टर्स - सिंगलजिन म्यूटेशन , क्रोमोजोमल अबनॉरमाँलिटी(गुणसूत्र दोष ) डाउन्स सिंड्रोम
२)जन्मापुर्विचे कारनीभुत घटक - १)गरोदर मातेचे कुपोषण २)गरोदरपणी मातेला संसर्ग होणे उदा . जर्मन मीज़ल(गोवर ) ३)बाळतपनाचेवेळी मातेचे वय ३५ ते ४० वर्षाचे असणे गरोदरपनी  मातेंन डॉक्टरी तपासणी शिवाय व सल्याशिवाय औषधे घेणे ,मद्यपान करणे , रेडीएशन घेणे इ.
३)जन्मवेळीची कारणे - बाळतपनाच्यावेळी अडथला येणे कि ज्यामुले मेंदूला दुखापत होणे चुकीच्या फोरसेपचा वापर ,उशिरा किंवा लांबत जाणारे   बाळतपण अतिरक्तस्त्राव / जन्मल्यानंतर मुलाने पहिला श्वास लवकर न घेणे/लवकर न रडणे .
४)जन्मानतरची कारणे - पहिल्या दोन वर्षात मुलांचे कुपोषण -१)मेंदूला संसर्ग होणे, मेंदूला आवालु उठने २)डोक्यास मार लागने /फीट येणे / इपिलेप्सी   ३)जन्मजात मेटाबोलिक डिसऑर्डर (इतर शारीरिक आजार )

      मुलाच्या एकंदर वाढीबद्दल व विकासाबद्दल त्याच्या आइकडून सविस्तर माहिती घेउन  २)मुलांची शारीरिक घडन व वर्तनाचे निरिक्षण करून उशिरा दिसणा-या वाढीच्या टप्यांच्या इतिहासावरूण शालेय अभ्यासक्रमात नापास होणे वार्तनातिल समस्या व समाजाच्या अपेक्षेविरुद्ध वर्तन

मतिमंदत्वाचे प्रकार :-
         १)सौम्य मतिमंदत्व
         २)मध्यम  मतिमंदत्व
         ३)तीव्र मतिमंदत्व

१)वैयक्तिक समस्या - ज्या मुलांचा बुध्यांक ३० पेक्षा कमी आहे अशा मुलांची संपूर्ण देखरेख कुटुंबालाच करावी लागते  जरी बुध्यांक ३० ते ५० असला तरी अशा मुलांना व्यवस्थित कपडे घालणे ,जेवण घेणे,आंघोळ करणे इ. गोष्टि करण्यास फार अवघड जाते. पालकांच्याही वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम होतो त्यांना सामाजिक कार्यास जाता येत नाही. आपले मुल अशा प्रकारचे आहे याबद्दल त्यांना कमिपणाची, अपराधिपनाची भावना असते.  त्यामुऴे  त्यांचे सामाजिक जीवन खालावते, घरामध्ये विशेषकरून आइलाच मुलाची देखभाल करावी लागते त्यामुले तिचे इतर मुलांकडे ,नव-याकडे थोडेफार दुर्लक्ष होते. त्यामुऴे कौटुंबिक समस्या निर्माण होतात. एकंदरीत अशा मुलांमुऴे कौटुंबिक स्वास्थ खालावते 

२)सामाजिक समस्या - मतिमंद मुलांचा इतर मुले सहसा स्वीकार करत नाहीत अशी मुले इतर चांगल्या मुलांकडून उपेशिली जातात.  किंवा हास्याचा विषय बनतात. त्यामुऴे पालक त्यास बाहेर जाऊ देत नाहीत घरातच डाबुन ठेवतात तसेच अशा  मुलांना धोक्याची जाणीवही फारशी नसते. घरांमध्ये इतर चांगली भावंडे त्याचा स्वीकार करत नाहीत त्यामुऴे मतिमंद मुलांमध्ये रागाची भावना निर्माण होते. त्यांचा मनामध्ये संघर्ष निर्माण होतो. ती नाउमेद  होतात. व अस्वाभाविक वर्तनुक दाखवितात  उदा - अस्वस्थ असणे ,आक्रस्थाऴेपना करणे , खुप खाणे कारण त्यांना प्रेम वात्सल्य मिळत नाही
३)शैक्षणिक समस्या - अशा मुलांची बुद्धि सामान्य बुद्धिपेक्षा कमी असते. त्यामुले ते शाऴेतही मागे राहतात ती नेहमीच्या शाळेत जाऊ शकत नहित. त्यांच्यासाठी समाजामध्ये विशेशशाला आहेत. याबद्दल पालकाना माहिती नसल्यामुले  ते मुलाला घरातच ठेवतात ती आणखिनच उपेशिली जातात अशा मुलांच्या शिक्षणावर पैसा खर्च करन्यापेक्षा ते मुलावर अधिक पैसा खर्च करतात
४)लैगिक व वैवाहिक समस्या :-वयात आल्यानंतर त्यांचे लैगिक कार्य स्वाभाविक असते. त्यामुऴे मुलींच्या बाबतीत इतर लोक त्यांचा गैरफायदा घेउन त्या कुमारी  माता बनण्याचा धोका असतो अशा मुलींची लग्न होणे हा एक मोठा प्रश्नच असतो मुली त्यांची मासिक पाळिची व्यवस्था करू शकत नाहीत त्यामुऴे ब-याच वेळा अशा मुलींची हिस्ट्रेक्टोमी(गर्भाशयाची पिशवीचे ऑपरेशन ) करतात
        
 उपचार :-
                मतिमंदत्वावर  समाधानकारक  उपचार उपलब्ध नाहीत कारण बुद्धीची पातळी  वाढविनेसाठी कोणतेही औषध उपलब्ध नाही.  झोपेची  औषधे किंवा न्युरोलेप्टिक  औषधे इ वापरून अशी मुले शांत ठेवली जातात अशा मुलांचे पुनर्वसन त्यांच्या बुध्यांक प्रमाणे करावे समाजात मतिमंद मुलांच्या शाला आहेत त्याबद्दल पालकांना मार्गदर्शन करावे.

मतिमंदत्व
अपूर्ण बौध्दिक वाढ ही एक मोठया प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. मतिमंदत्व म्हणजे 70 पेक्षा कमी बुद्ध्यांक . बुद्ध्यांक म्हणजे शारीरिक वय आणि मानसिक वय यांची तुलना. मानसिक वय भागिले शारीरिक वयगुणिले 100 म्हणजे बुद्ध्यांक. शारीरिक वय आपल्याला माहीत असते किंवा जन्मतारखेपासून काढता येते. मानसिक वय काढण्यासाठी चाचण्या असतात. पण या बुद्ध्यांक चाचणीशिवायही अंदाजाने मुलाची मानसिक वाढ पुरेशी आहे की कमी आहे हे सांगता येते.
आपल्या समाजात सुमारे तीन टक्के व्यक्ती मतिमंद असतात असे आढळून आले आहे. मतिमंदत्वाचे साधारणमध्यम व अतिमतिमंदत्व असे तीन प्रकार पाडता येतील. अपेक्षित मानसिक वाढीचा पाऊण हिस्साअर्धा हिस्सापाव हिस्साच मानसिक वाढ असेल तर अनुक्रमे साधारणमध्यम व अतिमतिमंदत्व आहे असे म्हणता येईल. या गटवारीचा उपयोग त्याच्या उपचाराचा व शिक्षणाचा विचार करताना होतो.
मानसिक अथवा बौध्दिक वाढ पडताळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आईवडिलांना माहिती विचारणे. या पुस्तकात मुलांच्या आरोग्याच्या प्रकरणात विकासाचे टप्पे दिले आहेत. हे टप्पे तसे आहेत की नाही हे पाहणे सोपे आहे. पाच वर्षे वयापर्यंत या तक्त्याचा उपयोग होईल. पाच वर्षावरील मुलांचा विकास लक्षात घेताना शाळेतली प्रगती व वर्तणूक यांवरून पडताळा घेता येईल.
शारीरिक ठेवण
काही मतिमंद मुलांची शारीरिक ठेवणही थोडी वेगळी असते. पण अशी वैशिष्टये फक्त अति मतिमंद मुलांमध्येच ओळखू येतात. साधारण मतिमंद मुलांमध्ये फार वेगळेपण दिसून येत नाही. अति मतिमंद मुलांमध्ये चेह-याची ठेवणडोळे हे सूचक असतात. डोक्याचा आकार लहान-मोठा असणेडोळे तिरपेकेस पिंगटजाड मोठी जीभइत्यादी चिन्हे मतिमंदत्वाची सूचक असतात. पण बरीच सौम्य-मध्यम मतिमंद मुले इतरांपेक्षा फारशी वेगळी दिसत नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे.
मतिमंदत्वाची कारणे
प्रसूतिपूर्व कारणे
कुपोषित मातागरोदरपणात चुकीची औषधे घेत राहणेगरोदरपणातले काही जंतुदोष (उदा. सिफिलिसगोवर)मद्यसेवन आणि पहिले मूल पस्तिशीनंतर होणे या काही कारणांमुळे मूल मतिमंद होऊ शकते. यांतली बरीच कारणे टाळता येण्यासारखी आहेत. चांगली प्रसूतिपूर्व तपासणी आणि आरोग्यशिक्षण होणे महत्त्वाचे आहे.गलगंड असलेल्या मातेची मुले मतिमंद असण्याची शक्यता असते.
प्रसूतिकालीन कारणे
बाळंतपणात मूल गुदमरणेबाळंतपणाला जास्त वेळ लागणे (उदा. मुलाचे डोके योनिमार्गात तासापेक्षा जास्त वेळ राहणे)बाळंतपणात डोक्याला (मेंदूला) इजा होणेबाळाचे श्वसन लगेच चालू न होणेबाळंतपणात अति रक्तस्राव होणेइत्यादी गोष्टींमुळे झालेले मूल मतिमंद होऊ शकते. नुसते बाळ बाहेर काढणे यापेक्षा बाळंतपणात बाळ सुरक्षित असण्याला महत्त्व आहे. बाळ सुरक्षित राहीललवकर बाहेर पडेल व लवकर रडेल अशी सर्व काळजी घेणे आवश्यक असते.
जन्मानंतरची कारणे
कुपोषणमेंदूला मार लागणेगोवरमेंदूज्वरमेंदूआवरणदाहकावीळअपस्मार (फिट्स),इत्यादी आजारांमुळे नंतर मतिमंदत्व येऊ शकते.
उपचार
मतिमंद मुलांना वाढवणे हे अगदी चिकाटीचे आणि सहनशीलतेचे काम आहे. हे करताना दोन उद्दिष्टे असतात.
मतिमंद मूल स्वतः जास्तीत जास्त कायकाय करू शकेल ते ठरवून त्याप्रमाणे प्रशिक्षण देत राहणे. असे मूल कायकाय करू शकेल ते मतिमंदत्वाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. अति मतिमंद मुले स्वतः आंघोळमलमूत्रविसर्जनजेवण व शारीरिक काळजी घेऊ शकली तरी त्या कुटुंबाची खूप मोठी सोय होते.
- मतिमंद मुलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी करण्यासाठी जेवढे शक्य आहे तेवढे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे.
या दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण एकाच छपराखाली देण्यासाठी काही शहरांत मतिमंद मुलांच्या शाळा आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी मात्र अशी आज तरी काहीही सोय नाही. काही कार्यकर्त्यांना खास प्रशिक्षण देऊनलहान प्रमाणावर प्रशिक्षण केंद्रे चालू करणे एवढे ग्रामीण भागात-निदान तालुक्याच्या ठिकाणी-शक्य होईल. या प्रशिक्षणात आईवडिलांचा व इतर कुटुंबीय मंडळींचा फार महत्त्वाचा भाग असतो. प्रशिक्षणाचे तंत्र समजावून घेणेमुलांच्या क्षमतेबद्दल अंदाज घेणेप्रोत्साहन देणेप्रेम आणि धीर देणे या सगळया गोष्टी घरातली मंडळी करू शकतात. जवळपास प्रशिक्षण केंद्र नसल्यास घरातल्या मंडळींनी ही जबाबदारी प्रशिक्षण घेऊन पार पाडणे आवश्यक असते.
मतिमंद मुलांना इतर शारीरिक आजारअपघात होऊ शकतात. हे टाळण्यासाठी त्यांची योग्य काळजीदखल घेणे आवश्यक आहे.
मानसिक आरोग्याच्या दृष्टीने गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांसाठी दहा सूचना
लक्षात ठेवा : ही माणसे मनोरुग्ण असू शकतील :
- निरर्थक बोलणा-याविक्षिप्त वागणा-या व्यक्ती,
- खूप वेळ व अवाजवी शांत राहणा-याइतरांशी मिळून मिसळून न वागणा-या अबोल व्यक्ती,
- इतर लोक ऐकू व पाहू न शकणा-या गोष्टींचा ज्यांना भास होत असेल अशा व्यक्ती,
- अतिसंशयीसतत कपटकारस्थानाची चाहूल घेणा-या व्यक्ती,
- अतिशय 'हवेतबोलणा-या व वागणा-याबढाया मारणा-याअवास्तव हास्यविनोद करणा-या व्यक्ती,
- सतत अतिदुःखी व रडत राहणा-या व्यक्ती,
- आत्महत्येचा विचार बोलून दाखवणा-या किंवा प्रयत्न करणा-या व्यक्ती,
- अंगात येणा-या व्यक्ती,
- झटकेबेशुध्दी येऊन खाली पडणा-या व्यक्ती,
- मंदअलिप्त दिसणा-याअपरिपक्व वाटणा-या व्यक्ती.
अशा व्यक्ती आढळल्यास त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडेडॉक्टरकडे पाठवण्याचा प्रयत्न करा,कुटुंबीयांना सावध करा व संयमाने शेवटपर्यंत पाठपुरावा करा.
मुलांच्या विकासाचे टप्पे :
वय विकासाचे टप्पे प्रशिक्षण
3 महिने मान धरणे
6 महिने हाताचा आधार घेऊन बसणे
9 म.- 1 वर्ष उभे राहणेचालणे
9म. - 1 वर्ष काही शब्द वापरायला सुरूवात
1- 2 वर्षे : माणसे ओळखणेचालणेछोटी वाक्ये बोलणेलाळ न गाळणेसोप्या सूचना पाळणेहाताने ग्लास धरून पिणेनिरनिराळे खाद्यपदार्थ ओळखणे. या वयात निरनिराळे रंगवास,आवाजस्पर्श यांची ओळख करून द्या.
2-4 वर्षे निरनिराळया सोप्या वस्तू ओळखणेअन्न चावून खाणेलघवीशी करणेइत्यादींबद्दल प्रशिक्षण देणे शक्य असते. घरातल्या कामात मदत करणेउघड धोके टाळणे (आग) जर हातपाय दुबळे असतील तर हातपाय चोळून द्या. लाकडी गाडयाच्या मदतीने चालू द्या. या टप्प्यांशी संबंधित प्रशिक्षण द्या.
4-7 वर्षे स्वतः आंघोळ करणेकपडे घालणेइतर मुलांबरोबर खेळणेकाही अक्षरे व अंक लिहिणे,सोपी वजाबाकी करणे.या टप्प्यांबद्दल प्रशिक्षण द्या. उदा. अक्षरे व अंक शिकवा

No comments:

Post a Comment