स्वमग्नता

स्वमग्नता


 एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो.
स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. याचे पूर्ण नाव सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे आहे. इंग्रजीत त्याला ‘ऑटिझम’ म्हणतात. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही. याचा शोध लिओ केनर यांनी सन १९४३ मध्ये लावला. अशी व्यक्ती आपल्याच विश्‍वात आणि विचारात रममाण असतात. अशा व्यक्ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही. स्वमग्नता हे विकाराचे एक लक्षण आहे. परंतु हे एक लक्षण म्हणजे पूर्ण विकार असे म्हणता येणार नाही म्हणून ही गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे असे म्हणतात.
लक्षणे
या मध्ये खालील लक्षणे दिसतात.
  • समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे न बघणे, नजरेला नजर न देणे.
  • दुसऱ्याकडे बघून स्मितहास्य न करणे.
  • भाषेचा विकास अतिशय विलंबाने वा अजिबात न होणे.
  • समोरच्याने बोललेलेच पुन्हा बोलणे.
  • स्वत:तच मग्न असणे.
  • संवादासाठी बोट दाखवणे, खाणाखुणा वापरणे, मान हलवून होकार-नकार देणे यांचा अभाव असणे.
  • दुसऱ्यांचे अनुकरण करता न येणे.
  • डोळ्यांची, हातांची विचित्र हालचाल करणे.
  • संपूर्ण वस्तूऐवजी तिच्या एखाद्या भागाकडेच बघत राहणे. (उदा. गाडीची फिरती चाके...)
  • फिरत्या वस्तूंकडे (पंखा, चाके) एकटक पाहात बसणे किंवा वस्तू फिरवणे.
  • काल्पनिक खेळांत न रमणे.
  • मी व तू या सर्वनामांचा चुकीचा वापर करणे. (उदा. तू कुठे चाललास? उत्तर - तू घरी चालला.)
  • अन्य व्यक्तींचे विचार, माहिती, भावना वेगळ्या असू शकतात हे माहीत नसणे.
  • मैत्री करता न येणे.
  • एकट्यानेच तोच- तोच खेळ खेळत राहणे.
  • परिस्थितीत बदल झाल्यास अस्वस्थ होणे.
  • एखादी गोष्ट पसंत नसल्यास रडून गोंधळ घालणे.
  • एकाच गोष्टीत नको इतका रस दिसतो.
  • सामान्य ज्ञान कमालीचे तोकडे असणे.
  • अतिक्रियाशील वा अतिमंद असणे.
  • प्रकाश, आवाज, स्पर्श, वास व चव यांबाबत कमालीचे संवेदनशील असणे.
  • भिंतींवर, कपाटांवर डोके- कपाळ घासण्यासारख्या कृती करणे.
  • वस्तूंचा वास घेणे, चाटणे.
  • वेदना झाल्यास तसा प्रतिसाद न देणे.
  • परिचित व्यक्तीनेही जवळ घेतल्यास, मिठी मारल्यास विरोध दर्शवणे.
वरील पैकी केवळ दोन-चार लक्षणे असल्यास ऑटिझम आहे असे म्हणता येणार नाही. तसेच ही सर्व लक्षणे प्रत्येक मुलात आढळतातच असेही नाही. मात्र, यापैकी अनेक लक्षणे दिसू शकतात.
ऑटिझमचे वर्गीकरण
  1. स्टीरिओटाईप
  2. कंपल्सिव्ह
  3. रिच्युअलिस्टीक
  4. रिस्ट्रीक्टेड



No comments:

Post a Comment