औपचारिक शिक्षण आणि प्रशिक्षण (विशेष मुलांचे शिक्षण)




औपचारिक शिक्षण आणि प्रशिक्षणसर्वसाधारण शिक्षणामध्ये प्रामुख्याने बालवाडी १ ली ते १० पर्यंतचे शिक्षण आणि  इतर खेळातील कला कौशल्य, मुलांची जडणघडण आणि शिक्षकांचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.बालवाडी शिक्षणसाधारणत: २ ते ५ या वयोगटातील मुलांना बालवाडीमध्ये प्रवेश दिला जातो. या ठिकाणी मुलांना अभ्यासाची प्राथमिक ओळख ह  वेगवेगळ्या खेळातून, चित्रातून होतअसते.यामध्ये पालेभाज्या, फळे, प्राणी, पक्षी, खेळातील साहित्य आणि वस्तू यांची ओळख मुलांना करून दिली जाते. त्याचबरोबर मुलांना  वेगवेगळे खेळ खेळायला शिकवले जाते. १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण साधारणता ५ व्या किंवा ६ व्या वर्षी मुलामुलींना १ ली च्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. १ली ते १०वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण त्यांना यादरम्यान मिळत असते. यामध्ये १ली पासून अक्षर ओळख व्हावी, म्हणून बाराखडी पासून त्यांच्या शिक्षणाला सुरुवात होते. तसेच भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील भाषा, गणित, इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, पर्यावरण, निबंध लेखन, पत्र लेखन, सारांश लेखन, वक्तृत्व कौशल्य तसेच वेगवेगळ्या खेळातील कौशल्य व त्यातील प्रगती या काळात विद्यार्थ्यांची जडणघडण  होत असते. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा पाया शाळेतील शिक्षणामध्ये तयार होत असतो. इतर कलाकौशल्यशालेय शिक्षणाबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही प्रकारच्या क्रीडा प्रकारात रस असतो. त्यामुळे खो-खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबाल, आट्यापाट्या, हॉकी, बुद्धिबळ, केरम टेनिस, पोहणे, लांब उडी, नेमबाजी, वक्तृत्व, लेखन करणे, कविता करणे या प्रकारामध्ये विशेष आवड असते. शिक्षणाव्यतिरिक्त  इतर कलाकौशल्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी प्रोत्साहन देण्याची सर्वात जास्त गरज असते. इयत्ता ४थी आणि ७वी मध्ये स्कॉलरशिपसारख्या स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि मानसिक चाचणी आणि हुशारीची कल्पना कळते.  शिक्षकांचा दृष्टीकोनशालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांचा दृष्टीकोन हा अत्यंत सकारात्मक असायला हवा. कारण या काळात विद्यार्थ्यांना सर्व गोष्टींची माहिती हळूहळू आणि नव्याने कळत असते. पालक   आणि शिक्षक यांच्याकडून विद्यार्थीदशेत मुले भरपूर प्रमाणात ज्ञान ग्रहण करतात. त्याचा उपयोग त्यांना आयुष्यभरासाठी होतो.विशेष (स्पेशल) मुलांचे शिक्षणसर्वसामान्य मुलांपेक्षा कमी – अधिक प्रमाणात ज्या मुलांमध्ये जन्मत: किंवा अपघाताने शारीरिकअथवा मानसिक अपंगत्व येते. अशा मुलांचा समावेश विशेष (स्पेशल) मुलांमध्ये होतो. स्पेशल मुलांसाठी शिक्षणाची पद्धत ही वेगळ्या रचनेच्या मांडणीत असल्यामुळे अशा मुलांसाठी त्यांच्या सोयींनुसार शाळांची उभारणी करण्यात येते. विशेष मुलांमध्ये अंधत्वय, कर्णबधिरत्वस, अस्थिविकलांगता, मानसिक विकलांगता, बहुविकलांगता, मतिमंद, गतीमंदत्वव, ऑटिझम, इत्यादी प्रकार येतात. शिक्षकांनादेखील विशेष प्रशिक्षण देऊनचमुलांना शिकवण्यासाठी तयार केले जाते. अंधत्वव असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ब्रेल लिपीचा उपयोग केला जातो. कर्णबधिरत्व विद्यार्थ्यांना श्रवणयंत्रांद्वारे शिकवण्यास मदत होते, तर मुक्या विद्यार्थ्यांना विशिष्ट हावभाव आणि प्रकारांद्वारे शिकवले जाते. अपंगत्वाचे अनेक प्रकार असल्यामुळे, त्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षक विविध माध्यमांद्वारे शिकवतात. मतिमंद आणि गतीमंद विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि गतीचा वेग हा सर्वसामान्य वेळेपेक्षा कमी असतो. म्हणून अशा मुलांना समजून घेऊन त्यादृष्टीने शिक्षक त्यांना शिकवतात.  विशेष मुलांचे शिक्षक प्रथमत: त्यांचे पालक म्हणजेच आई-वडिल असतात. त्यानंतर पालकत्वाची धुरा शिक्षकांकडे दिली जाते. विशेष मुलांचे शिक्षण हे त्याच्या शारीरिक अपंगत्वावर मात करण्याचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षण हे त्यांना आत्मविश्वास आणि जगण्याची दिशा देतात. कुठलाही न्यूनगंड न बाळगता ही मुले विविध क्षेत्रात पारंगत होतात. विशेष मुलांच्या शिक्षणामुळे ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होते. शिक्षण आणि प्रशिक्षणामुळे विशेष मुलांची प्रगती होऊन तसेच स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभी राहतात.

No comments:

Post a Comment